चंद्रपूरातील धक्कादायक घटना ! मित्रानेच केला मित्राचा घात, पैशाच्या वादाटून एकाची हत्या, एक गंभीर जखमी (Shocking incident in Chandrapur! A friend attacked a friend, one was killed due to a dispute over money, one was seriously injured)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरातील धक्कादायक घटना ! मित्रानेच केला मित्राचा घात, पैशाच्या वादाटून एकाची हत्या, एक गंभीर जखमी (Shocking incident in Chandrapur! A friend attacked a friend, one was killed due to a dispute over money, one was seriously injured)


चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचा ग्राफ वाढत चाललेला आहे, गोळीबार, खून अश्या अनेक घटनांनी चंद्रपूर हादरून गेला आता केवळ 500 रुपयासाठी मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरात दारूच्या नशेत वैरी झाले असून दारूच्या नशेत व पैशाच्या उसनवारी वरून दोघांमध्ये वाद होऊन एकाची हत्या झाल्याची घटना रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अष्टभूजा वार्ड परिसरात झाली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. साईनाथ रंगारी आणि आशिष परशुराम हे दोघे मित्र होते. तान्हा पोळ्याचे निमित्त साधून साईनाथच्या घरी दारू पित होते. रात्री 10:30 वाजताच्या सुमारास त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादाचे स्वरूप इतके विकोपाला गेले की, साईनाथने आशिषच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने वार केले. या हल्ल्यामुळे आशिषच्या डोक्यातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला. त्याने सुद्धा प्रतिकार करत साईनाथवर हल्ला केला. या संघर्षात आशिष परशुराम याचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर साईनाथ गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ वर्धा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, साईनाथची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलीस व रामनगर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आशिष आणि साईनाथ हे दोघेही चांगले मित्र असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्यातील वादाचे नेमके कारण काय होते, हे समजण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत व लवकरच या घटनेचा उलगडा पोलीस करतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)