स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूर येथील घरफोडी प्रकरणी 2 आरोपीना मुद्देमालासह अटक (Local Crime Branch action, 2 accused arrested with valuables in Ballarpur house burglary case)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूर येथील घरफोडी प्रकरणी 2 आरोपीना मुद्देमालासह अटक (Local Crime Branch action, 2 accused arrested with valuables in Ballarpur house burglary case)


चंद्रपूर :- बल्लारपूर बामणी येथील मुलचंदानी ले आऊट, टीचर कॉलनी येथे इस्तायिक अली जाकिर अली सय्यद यांचा घरी २ ते ३ जुलै चा मध्यरात्री चोरांनी घराचा मुख्य कुलूप फोडून घरात प्रवेश करून सोन्याचे बारी, अंगुठी, चैन, मंगळसूत्र असे एकूण ५० ग्रॅम दागिने सह जुना वापरता मोबाईल, नगदी असे एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केले आहे. ५ जुलै, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक गुन्हेगार शोध मोहीम राबवत असताना रेकॉर्ड वरील गुन्हेगार अतुल उर्फ मुजोर विकास राणा (२६) रा. भगतसिंग वार्ड बंगाली कॅम्प चंद्रपूर आणि ऋषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम (२४ ) रा. विसापूर यांनी बल्लारपूर पोस्टे हद्दीत घरफोडी केल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदर दोन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी बल्लारपूर येथे घरफोडी केल्याचे कबुली दिले. आरोपी कडून बल्लारपूर येथील घरफोडी येथील सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची एक चैन, सोन्याची दोन आंगठी, चोरीस गेलेला रेडमी कंपनीचा मोबाईल, रोख ४००/- असा एकुण १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. 
            रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचे दोन गुन्हे आणि राजुरा हद्दीत एक मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिले आहे. राजुरा हद्दीतून चोरी केलेली होंडा शाईन मोटार सायकल क्रं एम एच ३४ एक्स ५१५९ किंमत ४० हजार रुपये जप्त केले. आरोपी याच दुचाकी चा वापर करून घरफोडी करत होते. तसेच पो.स्टे. रामनगर अप.क्र. ४८४/२०२५ आणि ५७०/२०२४ कलम ३०५ (ए), ३३१(३) भारतीय न्याय संहिता गुन्ह्याचा छडा लागला आहे. आरोपी कडून एकुण १ लाख ९३ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येवुन आरोपींना बल्लारपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज बल्लारपूर पोलीसांनी आरोपी कडून घरफोडी मधील मुद्देमाल हस्तगत केले असून आरोपींना न्यायालयात पोलीस कोठडी ची मागणी केली असता न्यायालयाने आरोपींना एमसीआर देऊन तुरुंगात रवानगी केली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबोरकर, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंह, गणेश मोहुर्ले, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)