बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, 8 मेमू प्रवासी गाड्यांची सेवा रद्द (Mega block on Ballarshah-Gondiya railway lines today, services of 8 MEMU passenger trains cancelled)
बल्लारपूर :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत नागभीड - ब्रह्मपुरी दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकखाली गोसीखुर्द कालव्याचे काम आज १५ जून रोजी होणार आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने बल्लारशाह - नागभीड - गोंदिया रेल्वे मार्गादरम्यान ८ तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे एकूण ७ मेमू पॅसेंजर गाड्यांचे ट्रिप रद्द होतील. त्याचबरोबर या मार्गावर धावणाऱ्या मालगाड्या बल्लारशाह - सेवाग्राम-नागपूर मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. ब्रह्मपुरी, नागभीड तहसील व चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गोसीखुर्द कालव्याचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. आज १५ जून रोजी नागभीड-ब्रह्मपुरी रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे रुळाखालून कालवा जाणार आहे. त्यासाठी कालव्याच्या वरचा ट्रॅक वेगळा करून कालव्याचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे. त्यामुळे आज दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने या मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला असून, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना गैरसोय टाळण्यासाठी प्रवास पुढे ढकलण्याची किंवा अन्य मार्गाने प्रवास करण्याची विनंती केली आहे. बल्लारशाह-गोंदिया हा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा अत्यंत व्यस्त रेल्वे मार्ग आहे. मेमू पॅसेंजर ट्रेन आणि गुड्स ट्रेन व्यतिरिक्त या मार्गावर सुपर फास्ट ट्रेन देखील धावतात. मात्र आज १५ जून रोजी रेल्वेने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ८ तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला असून या मार्गावरील सर्व गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे मालगाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेवर धावणाऱ्या मालगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या वेळी या सर्व गाड्या बल्लारशाह येथून सेवाग्राम-नागपूरमार्गे गोंदिया मार्गे निघतील.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या