सामाजिक न्याय दिन व तृतीयपंथीय कार्यशाळा तृतीयपंथीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास शासन कटिबद्ध : अतिरिक्त जिल्हाधिकारी व्यवहारे (Social Justice Day and Transgender Workshop Government committed to bringing Transgenders into the mainstream of development: Additional District Collector Affairs)

Vidyanshnewslive
By -
0
सामाजिक न्याय दिन व तृतीयपंथीय कार्यशाळा तृतीयपंथीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास शासन कटिबद्ध : अतिरिक्त जिल्हाधिकारी व्यवहारे (Social Justice Day and Transgender Workshop Government committed to bringing Transgenders into the mainstream of development: Additional District Collector Affairs)
चंद्रपूर :- तृतीयपंथीय हे समाजाचा अविभाज्य घटक असून काही गैरसमजुती पोटी आपण त्यांना आपल्यापासून दूर केले आहे. याचा परिणाम म्हणून त्यांना संघर्षांला सामोरे जावे लागत आहे. मात्र यापूढे ते आपला समाज घटक आहेत, आपले बांधव आहेत, असे समजुन आपण सर्वांनी त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करावा व शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी नितिन व्यवहारे यांनी केले. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा जात पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेव आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, समतादुत प्रकल्प व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक न्याय व तृतीयपंथीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदु आवारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते. यावेळी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहात राहून 85 ते 100 टक्के गुण प्राप्त 12 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संबोधन ट्रस्टचे राज काचोळे व प्रशिक मेश्राम यांना व कार्यक्रमाला उपस्थित सर्व तृतीयपंथीय लाभार्थ्यांना साडीचोळी देवून सन्मानित करण्यात आले. तृतीयपंथीय कार्यशाळेत हमसफर ट्रस्टचे आशु गोयल यांनी व निलोफर मॅडम यांनी तृतीयपंथीय कसा ओळखावा, त्यांची भावनिक, मानसिक गरजा काय आहे, त्या आळखून समाजातल्या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्याशी कसा व्यवहार करावा, त्यांना काय अपेक्षित आहे. याबद्दल महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक पुनम आसेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे, स्मिता बहिरमवार, श्वेता लक्कावार, गणेश खोटे, संदिप वाढई. सूरज डांगे, संजय बन्सोड, सजल कांबळे, राबीया अली, चेतना खाडीलकर, अमोल गोहणे, राहुल आकुलवार, उर्मिला केरझरकर, संतोष सिडाम, ठाकरे मॅडम, बार्टी चे सर्व समतादूत सर्व क्रिस्टल कर्मचारी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहाचे गृहपाल व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्येने तृतीयपंथीय लाभार्थी वृद्ध नागरिक, शाळा, महाविद्यालय व वसतिगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)