वर्ध्यात शेतीच्या धुऱ्याचा वाद जीवावर बेतला, काकू अन् चुलत भावाला कुऱ्हाडीनं संपवलं, नंतर आरोपीनं विष प्राशन करून केली आत्महत्या (A dispute over agricultural land in Wardha took a toll on his life, aunt and cousin were killed with an axe, then the accused committed suicide by consuming poison.)

Vidyanshnewslive
By -
0
वर्ध्यात शेतीच्या धुऱ्याचा वाद जीवावर बेतला, काकू अन् चुलत भावाला कुऱ्हाडीनं संपवलं, नंतर आरोपीनं विष प्राशन करून केली आत्महत्या (A dispute over agricultural land in Wardha took a toll on his life, aunt and cousin were killed with an axe, then the accused committed suicide by consuming poison.)


वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात एक धक्कादायक घटना घडली. शेतीच्या वादावरून झालेल्या वादात चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केली आहे. त्यानंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून तसेच ठेक्याने शेती लावण्यावरून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की शुक्रवारी सकाळी रागाच्या भरात महेंद्र मोहिजेने यांनी संतप्त अवस्थेत नितीन आणि त्याची आई साधना यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत त्यांचा जागीच खून केला. खून केल्यानंतर महेंद्रने स्वतः विष प्राशन केलं आणि काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. ही घटना समजताच वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या संदर्भात विश्वसनीय सूत्राद्वारे पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता. शेतीच्या मालकी हक्कावरून आणि उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते. सध्या पोलीस पुढील तपास करत असून, शेजारी आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत. या दुहेरी खून आणि आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत मृत झालेल्यांमध्ये साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा समावेश आहे. या दोघांची हत्या महेंद्र मोहिजे या त्यांच्या पुतण्याने केली. पोलीस तपासानुसार, गेल्या काही दिवसांपासून महेंद्र आणि नितीन यांच्यामध्ये शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून वाद सुरू होता. गावातील काही जमिनी ठेक्याने लावण्यावरूनही तणाव वाढला होता. सध्या अल्लीपूर पोलीस पुढील तपास करत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)