बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात रयतचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी क्रांतिसूर्य महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, डॉ. किशोर चौरे(इतिहास विभाग प्रमुख), प्रकाश मेश्राम (वरिष्ठ लिपिक), यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले.
यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले सामाजिक न्याय म्हणजे काय राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे योगदान यावर चर्चा झाली. यावेळी कार्यक्रमाला डॉ. रोशन फुलकर, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, डॉ. विनय कवाडे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. रोशन साखरकर, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, प्रा. कृष्णा लाभे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी अंतर्गत अशोक गर्गेलवार, सिद्धार्थ मोरे, शामराव दरेकर, विशाल पारधी, अश्विनीताई यांच्या सह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या