बल्लारपूरातील वनजमिनीवर घरांच्या अफवांना आळा नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही माझी नैतिक जबाबदारी आ. सुधीर मुनगंटीवार (It is my moral responsibility to stop the rumors of houses on forest land in Ballarpur and protect the interests of the citizens. Sudhir Mungantiwar)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील रवींद्र नगर वार्ड, मौलाना आझाद वार्ड, पंडित दीनदयाळ वॉर्ड, डॉ. राजेंद्र प्रसाद वार्डातील नागरिक मागील ३०-४० वर्षांपासून तेथे राहतात. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली या भागातील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची अफवा काही लोक जाणीवपूर्वक पसरवत आहेत. या अफवांमध्ये तथ्य नाही. यासाठी २५ जून रोजी बल्लारपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात वनजमिनीवरील घरांच्या अफवांवर स्पष्टता येण्यासाठी बैठक झाली. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या वेळी भाजपा ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, काशीनाथ सिंह सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार रेणुका कोकाटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता मुकेश कुमार टांगले, उपविभागीय कार्यकारी अभियंता संजोग मेंढे, वनविभाग चे सहाय्यक उपवनसंरक्षक आदेश कुमार शेडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी धनंजय साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैभव जोशी सह शेकडो नागरिक उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या