बल्लारपूर तालुक्यात गावापातळीवर दोन दिवस "महाराजस्व अभियान" राबविण्यात येणार ("Maharajaswa Abhiyan" will be implemented at the village level for two days in Ballarpur taluka.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर तालुक्यात गावापातळीवर दोन दिवस "महाराजस्व अभियान" राबविण्यात येणार ("Maharajaswa Abhiyan" will be implemented at the village level for two days in Ballarpur taluka.)


बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, सन 2024-25 या महसुली वर्षामध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी गावपातळीवर "महाराजस्व अभियान" राबविण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सदर अभियाना अंतर्गत खालील प्रमाणे योजनेचा लाभ घेण्याकरीता गावपातळीवर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. 1. अग्रीस्टॅक नोंदणी, 2. संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना डिबीटी अदयावत करणे 3. पांदन रस्ते मोकळे करणे, 4. शैक्षणीक प्रयोजनाकरीता विवध प्रकारचे दाखले व सोईसुविधा उपलब्ध करून देणे, 5. ई-पिक पहाणी, 6. जिवंत 7/12, 7. राशन कार्ड अन्य. तरी वरील सर्व बाबी एकाच ठिकाणी जनतेला उपलब्ध करून देण्याकरीता दिनांक 9 जुन, 2025 रोजी मौजा- विसापूर येथे व दिनांक 11 जुन, 2025 रोजी मौजा कोठारी येथे महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेनी या शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरीता दिलेल्या दिनांकास दिलेल्या स्थळी उपस्थित राहुन योजनेचा लाभ घ्यावा. असे तहसिलदार बल्लारपूर यांचेमार्फत आव्हान करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)