स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, घरफोडी प्रकरणी एका आरोपीला अटक, ६.६० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त (Local Crime Branch action, one accused arrested in house burglary case, gold ornaments worth Rs 6.60 lakh seized)
चंद्रपूर :- घराला कुलूप लावून मुलीचा उपचाराकरिता बाहेर गावी गेलेल्या महिलेच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्या कडून ६ लाख ६० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहे. सरफरोज उर्फ टायगर सागीर शहा (२४) रा. आमटे लेआउट, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर असे आरोपीचे नाव आहे. डिस्पेन्सरी चौक रयतवारी कॉलरी येथील रहिवासी संगीता जनार्धन पाटील (६१) ही महिला मागील दोन ते तीन महिन्यापुर्वी घराला लॉक करून मुलीचे उपचारासाठी परिवारासह टाकळघाट ता. बुट्टीबोरी, नागपूर येथे गेली होती. दरम्यान ३१ मे रोजी घराजवळील व्यक्तीने फोन करून घराचे लॉक तुटलेले असल्याचे सांगितले. सदर गुन्हयाचे गांर्भीय पाहता, सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक, स्थागुशा यांचे नेतृत्वात चंद्रपुर पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात शोध मोहीम सुरू करून अथक परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपी सरफरोज उर्फ टायगर सागीर शहा (२४) रा. आमटे लेआउट, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस करून त्याचेकडुन ६८ ग्रॅम सोन्याचे दागीने किमंत अंदाजे ६ लाख ६० हजार रुपयाचा माल जप्त केले. फिर्यादीने घर गाठले असता आलमारीतील सोन्याचांदीचे दागीने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. याबाबतची तक्रार संगिता पाटील हिने रामनगर पोलिसात दाखल केली. अशा फिर्यादीचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप. क्रमांक ४२७/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा दिपक डोंगरे, पोअं प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, पोशि रूपय बारसिंगे यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या