बल्लारपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई, ८०० पॉकेट प्रतिबंधित बीटी बियाणेसह दोन आरोपींना अटक १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Joint operation by Ballarpur Police and Local Crime Branch, two accused arrested along with 800 pockets of banned Bt seeds, seized valuables worth Rs 13 lakh 50 thousand)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई, ८०० पॉकेट प्रतिबंधित बीटी बियाणेसह दोन आरोपींना अटक १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Joint operation by Ballarpur Police and Local Crime Branch, two accused arrested along with 800 pockets of banned Bt seeds, seized valuables worth Rs 13 lakh 50 thousand)


बल्लारपूर :- ८०० पॉकेट प्रतिबंधित बीटी बियाणे वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करत १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर संयुक्त कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि बल्लारपूर पोलीसांनी १४ जुन रोजी केले. इमरान खान नासीर खान (३७) रा. बगड खिडकी वार्ड चंद्रपूर आणि माल मालक सुमित नगराळे रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे आरोपींचे नाव आहे. १४ जुन, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक पोलीस ठाणे बल्लारपूर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस ठाणे बल्लारपूर चे पथकासह विसापूर-बल्लारपूर रोड वर सापळा रचुन चाचाकी वाहन टाटा एस क्रं एमएच ४० एबी २३५६ ला थांबवुन सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात एकुण ८०० नग पॉकेट चोर बीटी पुष्पा ५ नी संशोधित हायब्रीड कापूस बियाणे प्रति पॉकेट किंमत १ हजार ५००/- रु. प्रमाणे एकुण १२ लाख रुपयाचा माल अवैध रित्या मिळुन आल्याने सदर बियाणांची पडताळणी व कारवाई करणेसाठी कृषी विभागाला माहिती देवुन कृषी विभागाचे अहवालावरुन वाहन चालक आरोपी नइमरान खान नासीर खान (३७) रा. बगड खिडकी वार्ड चंद्रपूर आणि माल मालक सुमित नगराळे रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांचेविरुध्द पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध क्रमांक ४२१/२०२५ कलम २२३ भारतीय न्याय संहिता सहकलम १४, ७ (अ), ७ (क), ७ (ड), १९ बीज अधिनियम १९६६ व बियाणे नियंत्रक आदेश १९८३ चे कलम ३,८,१ तसेच बियाणे नियम १९६८ चे कलम ८,९,१०,११ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ८,१५, १५(१), (२),१६(१)(२) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ (२) (ड) ७अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दिपक कॉकेंडवार व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस ठाणे बल्लारपूर येथील अंमलदारांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)