चंद्रपूर आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 151 वी जयंती निमित्त बहुजन समाज पार्टी चंद्रपूर, व्दारा जिल्हा कार्यकर्ता मेळावा (District workers' gathering organized by Bahujan Samaj Party Chandrapur on the occasion of the 151st birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahuji Maharaj, the father of reservation)
चंद्रपूर :- आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 151 वी जयंती निमित्त बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर, व्दारा जिल्हा कार्यकर्ता मेळावा दि. 23 जुन 2025 रोज सोमवारला सकाळी ११ वा. स्थळ राजीव गांधी सभागृह, जयंत टाॅकीजच्या बाजूला चंद्रपूर. मेळाव्यास संबोधन करण्यासाठी नॅशनल कोरडीनेटर तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा. राजाराम साहेब. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ऍड सुनील डोंगरे साहेब यांचे चंद्रपूर नगरीत आगमन. तरी होणाऱ्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभेतील बसपा पदाधिकारी व बसपा कार्यकर्त्यांनी आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक यांनी आपल्या अमुल्य वेळेसह तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन मा. राजेश ब्राम्हणे जिल्हा प्रभारी व विधानसभा ईंचार्ज बल्लारपूर यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या