मोहर्ली वनपरिक्षेत्रात वट पोर्णिमा निमित्य महिला वनरक्षकांचे वट वृक्षांचे वृक्षारोपण (Banyan tree plantation by women forest guards on the occasion of Vat Purnima in Mohorli forest area)

Vidyanshnewslive
By -
0

मोहर्ली वनपरिक्षेत्रात वट पोर्णिमा निमित्य महिला वनरक्षकांचे वट वृक्षांचे वृक्षारोपण (Banyan tree plantation by women forest guards on the occasion of Vat Purnima in Mohorli forest area)

चंद्रपूर :- मोहर्ली वनपरिक्षेत्रातील महिला वनरक्षक कु. आरती आईटलावार, वनरक्षक मोहर्ली-। यांच्या पुढाकाराने महिला वनरक्षक कु. सुमैया सिद्धिकी, वनरक्षक देवाडा, कु. टीना काळे, वनरक्षक पद्मापूर-।, सौ. शितल चौधरी, वनरक्षक पद्मापूर-।।, कु. माया बुरडकर, वनरक्षक चिचोली, श्री. संजय जुमडे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली, श्री. सुरेंद्र मंगाम, वनरक्षक सितारामपेठ, श्री. विखुल जनबंधू, वनरक्षक मुधोली यांनी मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात वटसावित्रीच्या निमित्ताने वट वृक्षाची लागवड करून जतन व संगोपन करण्याचा निर्धार केला. वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. वट वृक्षाचे महत्व यावर सविस्तर माहिती संतोष थिपे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (प्रादे.) यांच्या वतीने देण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)