पालकमंत्र्यांच्या हस्ते डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन, रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचारासाठी होईल मदत (The Guardian Minister inaugurated the expanded room in the dialysis department, patients will be helped with timely and proper treatment.)

Vidyanshnewslive
By -
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन, रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचारासाठी होईल मदत (The Guardian Minister inaugurated the expanded room in the dialysis department, patients will be helped with timely and proper treatment.)


चंद्रपूर :- जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपुर येथे डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते व आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मा.सां. कन्नमवार शास. वैद्य. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, अति. जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी डायलेसिस विभागातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची प्रशंसा करून पुढेही अशाच प्रकारचे काम करीत राहावे. तसेच रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर वेळेत आणि चांगले उपचार करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. डायलेसिस विभागामध्ये मासिक 550 ते 600 डायलेसिस होतात. सन 2024-25 या वर्षात एकूण 6368 डायलेसिस करण्यात आले. यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्हा रुग्णालयामध्ये सुरुवातीला 9 डायलेसिस मशीन कार्यान्वित होत्या. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 20 ते 24 रुग्ण हे प्रतिक्षाधीन होते. रुग्ण हा आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, या उदे्शाने पालकमंत्री डॉ. अशोक उईके तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीमधून 4 नवीन डायलेसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डायलेसिस विभागाचे विस्तारीकरण झाल्यामुळे आता सर्व डायलेसिस रुग्णांना सेवा देता येईल व कोणत्याही रुग्णांना आर्थिक भुदंड बसणार नाही.

 
         सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत 13 डायलेसिस मशीनद्वारे सेवा देण्यात येत असून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग कर्मचारी येथे रुग्णांची सेवा बजावत आहेत. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. डायलेसिस विभाग हा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळतील. तरी जास्तीत जास्त डायलेसिस रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. चार रुग्णवाहिकांचेही लोकार्पण जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने दाखल झालेल्या चार नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, किर्तीकुमार भांगडीया, देवराव भोंगळे, करण देवतेळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)