चंद्रपूर :- राजर्षी शाहु महाराज यांची जयंती म्हणजे सामाजिक न्याय दिनाचे s औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर मार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 26 जून ते 4 जुलै या काळात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सत्र 2025-26 मध्ये एमएचटी-सीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी ॲग्री, बी.फार्म, बीएससी नर्सिंग इत्यादी सीईटी देऊन व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित असणारे, ज्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे, अशा उमेदवारांनी 26 जून ते 4 जुलै 2025 दरम्यान विशेष मोहिमे अंतर्गत आपला जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करावा. तसेच 12 वी विज्ञान शाखेतील सत्र 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीसुध्दा या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणपत्र पडताळणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला रितसर, परिपुर्ण भरलेला अर्ज तात्काळ सादर करावा. तसेच या मोहिमेत त्रृटीपुर्तता करून घ्यावी. ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज दाखल केलेले आहे, परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांची प्रकरणे त्रुटीमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या दिनांकास किंवा त्यापुर्वी आपण सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊन त्रुटीपुर्तता करून घ्यावी. जेणेकरून सत्र 2025-26 मधील प्रवेशप्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्रा अभावी कुठल्याच मागासवर्गीयांना वंचित राहण्याची वेळ येणार नाही, असे समितीचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या