पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम - आ. किशोर जोरगेवार (Prime Minister Narendra Modi inaugurated Chanda Fort Railway Station through video conferencing, the historic transformation of Chanda Fort Station is the result of Prime Minister Narendra Modi's vision - MLA. Kishor Jorgewar)
चंद्रपूर :- चांदाफोर्ट स्थानकाचा झालेला कायापालट हा केवळ भौतिक स्वरूपातील बदल नाही, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मूर्तस्वरूप आहे. त्यांच्या संकल्पशक्तीमुळे आणि केंद्र शासनाच्या सहकार्यामुळेच आज चंद्रपूरकरांना स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक रेल्वे स्थानक अनुभवता येत आहे. चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, स्वातंत्र्यसैनिक डॉ. शेषरावजी इंगोले, मुख्य अभियंता बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, दामोदर मंत्री, पूनम तिवारी, प्रकाश देवतळे, सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठल डुकरे, रवी गुरनुले, देवानंद वाढई, मधुसूदन रुगंठा, प्रदीत किरमे, वंदना हातगावकर, मधुकर राहूत, सुदामा यादव, विश्वजित शाहा, नकुल वासमवार, विनोद अनंतवार, कार्तिक बोरेवार, राहुल मोहुर्ले, शेखर शेट्टी, सलीम शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात "अमृत भारत स्टेशन योजना" अंतर्गत देशातील १०३ नव्याने पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण झाले, ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. चांदाफोर्ट स्थानकाचे या यादीत समावेश होणे हे आपल्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. चांदा फोर्ट स्थानक हे केवळ एक स्थानक नसून, हे या परिसराचा सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार ठरेल. या स्थानकामुळे स्थानिक नागरिकांना आधुनिक, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सेवा मिळतील. आता हे स्थानक अधिक सुरक्षित आणि सुसज्ज सुविधांनी युक्त असेल. स्थानकातील प्रवाशांसाठी नवीन सुविधा, व्हीलचेअर ॲक्सेस, सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, डिजिटल सिस्टीम्स, एलईडी डिस्प्ले, आधुनिक तिकीट व्यवस्था, स्वच्छतागृहे, आणि व्यावसायिक गरजांसाठी सुलभ मालवाहतूक व्यवस्थापन या सर्व सुविधा मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या सहकार्याने, रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून हे शक्य झाले. स्थानकासह रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अधिकाधिक योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच या परिसरातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या