बल्लारपूर पोलिसांची कारवाई, घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह अटक (Ballarpur police take action, house burglar arrested with valuables)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची कारवाई, घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह अटक (Ballarpur police take action, house burglar arrested with valuables)


बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीसांनी काल आणखी एका दरोड्यातील आरोपीला अटक केले आहे. शहरातील कॉलरी वसाहत, भगत सिंग वॉर्ड मध्ये झालेल्या चोरीचे बल्लारपूर पोलीसांनी छडा लावत दोन गुन्ह्यात सहभागी एका चोरट्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्या कडून चोरी गेलेले २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. लवकुश उर्फ डू उमेश निषाद (२०) रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर जि. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी तिरूपती व्यंकन्ना कलीकोटा (३१) रा.डब्लु.सि.एल क्वार्टर नं. ४/०१ तिलक वार्ड, बल्लारपुर जि.चद्रपुर यांचे क्वार्टर मध्ये ८ जानेवारी, २०२५ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान अज्ञात आरोपीने क्वॉटरचा ताला तोडुन, आत प्रवेश करून क्वॉटरचे दोन नंबरचे रूम मध्ये असलेल्या लोखंडी आलमारचे कुलुप तोडुन त्यात असलेले सोन्याचे दागीने व रोख रक्क्म असे एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, विकास जुमनाके, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, चंद्रशेखर माथनकर, भास्कर चिंचवलकर, सचिन राठोड व म.पो. अंमलदार अनिता नायडू, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे. तिरूपती व्यंकन्ना कलीकोटा यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे बल्लारपुर येथे अप क्रं. ७५/२०२५ कलम ३३१(२), ३३१(४), ३०५(अ) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेले मालाचा शोध घेतला असता आरोपी लवकुश उर्फ डू उमेश निषाद (२०) रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर जि. चंद्रपूर यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आरोपीस विश्वासात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयात चोरी गेलेले सोन्याचे दागीने असे एकूण आज रोजीचे सराफा मुल्यांकणानुसार २ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागीने मुद्देमाल तसेच पोलीस ठाणे बल्लारपुर अप क्रं. १५४/२०२५ कलम ३३१(२),३३१(४), ३०५ (अ) बीएनएस मध्ये घरफोडी करून चोरलेला घरगुती वापराचा गॅस सिलेंडर किंमत अंदाजे ४ हजार रुपयांचा माल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)