चंद्रपूरातील महाकाली मंदिरात "दहशतवादी हल्ला आणि ओलीस मुक्तता" यावर आधारित पोलीस विभागाची रंगीत तालीम (Police Department's colorful rehearsal based on "Terrorist Attack and Hostage Rescue" at Mahakali Temple in Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात "दहशतवादी हल्ला आणि ओलीस मुक्तता" यावर आधारित पोलीस विभागाची रंगीत तालीम (Police Department's colorful rehearsal based on "Terrorist Attack and Hostage Rescue" at Mahakali Temple in Chandrapur)

चंद्रपूर :- भविष्यातील संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर पोलीस दलाकडून काल २४ मे रोजी श्री माता महाकाली मंदिर परिसरात "दहशतवादी हल्ला आणि ओलीस मुक्तता" यावर आधारित रंगीत तालीम घेण्यात आली. या तालिमीत हल्ला झाल्यास पोलीस यंत्रणा कशी प्रतिसाद देईल आणि ओलीस बनवलेल्या नागरिकांची सुटका कशी केली जाईल, याचे अत्यंत शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. दुपारी २ वाजता मंदिर परिसरात चार दहशतवाद्यांनी शस्त्राचा धाक दाखवून भाविकांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलीस कंट्रोलरूमला मिळाली. त्वरित प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री योगेश्वर पारधी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विविध पोलिस पथकांना रवाना केले. 

            या वेळी ATB, QRT, RCP, BDDS, K9, C-60, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, पोलीस रुग्णालय वैद्यकीय पथक इत्यादी सर्व यंत्रणा काही क्षणांत घटनास्थळी दाखल झाल्या. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी ताबा घेत तंतोतंत नियोजनानुसार सर्व पथकांना समन्वयात ठेवत कोणतीही जीवितहानी न होता प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पूर्ण केले. दहशतवाद्यांचा "खात्मा" करीत ओलीस बनवलेले सर्व नागरिक सुखरूपपणे वाचवले गेले. ही तालीम यशस्वी करण्यासाठी पुढील अधिकाऱ्यांचे विशेष योगदान होते श्री प्रमोद चौगुले (परि. पोलीस उपअधीक्षक), श्री प्रवीण कुमार पाटील (पो.नि. वाहतूक शाखा), श्री अमोल काचोरे (पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा), श्रीमती प्रभावती एकुरके (पो.नि. पो.स्टे. चंद्रपूर शहर, श्री धर्मेंद्र मडावी (सहाय्यक पोलीस निरीक्षक, C-60), श्री प्रवीण सोनोने (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक), श्री शिरभाते (उपनिरीक्षक, सुरक्षा शाखा), श्री खोंडे (उपनिरीक्षक, BDDS), श्री भोयर (उपनिरीक्षक, एटीबी), डॉ. कुरेशी (पोलीस वैद्यकीय अधिकारी), तसेच पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर व रामनगर, तसेच संबंधित सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट समन्वय ठेवून प्रात्यक्षिक यशस्वी केले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या नेतृत्वात पार पाडली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)