बल्लारपूरमध्ये तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी फिल्ड सर्व्हे सुरू शहरातील १२६ घरांवर टांगती तलवार, आज जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीचे नियोजन (Field survey begins for third railway line in Ballarpur, sword hanging over 126 houses in the city, meeting planned with District Collector today)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरमध्ये तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी फिल्ड सर्व्हे सुरू शहरातील १२६ घरांवर टांगती तलवार, आज जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीचे नियोजन (Field survey begins for third railway line in Ballarpur, sword hanging over 126 houses in the city, meeting planned with District Collector today)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहर हे मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे व दक्षिण रेल्वे या 3 झोन साठी महत्वपूर्ण असे रेल्वे स्थानक असून भविष्याच्या दृष्टीने बल्लारपूर शहरातील मध्य रेल्वेच्या तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी क्षेत्र सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. भविष्यासाठी राष्ट्रीय रेल्वे वाहतुकीच्या मोठ्या योजनेचा भाग आहेत व या अनुषंगाने बी टी एस प्लॉट, शिवाजी वॉर्ड, बल्लारपूर येथील एकूण १२६ घर या भागात येत असल्याने काही लोकांना त्यांच्या घराबाबत अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व १२६ कुटुंबांनी चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची २५ मे रोजी शासकीय विश्रामगृह, बल्लारपूर येथे भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी समस्या समजून घेत समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. असून आज २६ मे रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासमवेत बैठकीचे नियोजन केले. यावेळी चंदनसिंग चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, एड. रणंजय सिंग, इंजि देवा वाटकर, घनश्याम बुरडकर, प्रभदीप सचदेवा, अजहर शेख, ओमप्रकाश प्रसाद, विशांक सोमबंसी, सुरेंद्र राणा, अमित पिने व भाजप कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शहरवासीय उपस्थित होते.

           
           या संदर्भात आज चंद्रपूर येथील नियोजन भवनात सावरकर नगर, पटेल नगर तसेच बल्लारपूर बी.टी. एस. प्लॉट येथील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या प्रश्नावर बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी रेल्वे चे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे आणि नागरिक यांच्या सामंजस्यातुन अतिक्रमण धारकांना त्यांच्या घरानुसार योग्य मोबदला देऊनच त्यांची घरे हटवण्यात येतील असे आश्वासन यावेळी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांनी सुद्धा या प्रश्नावर सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)