वर्धा :- प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देश ढवळून काढणारा भाजप आता देशात आणि राज्यात सत्तेवर आहे. परंतु त्याच प्रभू रामाच्या मंदिराच्या गर्भगृहात भाजपच्या माजी खासदाराला त्याच्या पत्नीसह प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय वर्ध्याच्या भाजपच्या माजी खासदारास आज राम मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे गावकरी मोठ्या प्रमाणात संतप्त आणि नाराज झाले. राम मंदिरातील मूर्तिच्या पूजेसाठी माजी खासदार हे गर्भ गृहात शिरत असताना पुजाऱ्याने त्यांना रोखले व मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच रहा, असे बजावले. देश महासत्ता होण्याची व मंगळावर अंतरिक्ष स्थानक स्थापन करण्याची भाषा बोलतोय. मात्र, दुसरीकडे अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी काळी अनुभवलेले अस्पृश्यपण आजही दिसून येण्याची धक्कादायक घटना घडत आहे. ते सुद्धा आज राम नवमीला आणि भाजप नेत्याच्या बाबतीत. वर्धा जिल्ह्यातील देवळीतील राम मंदिरातील ही घटना अत्यंत वाईट अनुभव देणारी आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी गावात हे राम मंदीर खूप जुने आहे. आज गावात राम नवमीची धामधूम सूरू असताना माजी खासदार व त्यांच्या पत्नी सोबत तसेच काही भाजप पदाधिकारी हे राम दर्शनास या मंदिरात पोहचले. त्यावेळी पूजा सूरू होती. मूर्तिच्या पूजेसाठी माजी खासदार हे गर्भ गृहात शिरत असताना पुजाऱ्याने त्यांना रोखले. मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच रहा, असे बजावले. हे ऐकून माजी खासदार चांगलेच स्तब्ध झाले. काय गुन्हा त्यांना कळलेच नाही. म्हणून त्यांनी पुजाऱ्यास विचारणा केली कां बरं मी आत जाऊ शकत नाही. तेव्हा त्या पुजाऱ्याने दटावले की की, "तुम्ही सोवळे घातलेले नाही, जानवे नाही, नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही, बाहेर निघा." असे पुजाऱ्याचे काळजावर घाव घालणारे बोल ऐकताच बोल ऐकताच माजी खासदार यांना काहिच सुचेनासे झाले. या मंगल प्रसंगी वाद नको म्हणून ते माघारी फिरले. माजी खासदार यांनी मग सपत्नीक गाभारा सोडला. मूर्ती भोवती असलेल्या कठड्या बाहेर उभे राहून दर्शन घेतले. पूजेचे ताट हातीच राहले. मूर्तिवर त्यांना फुलं वाहता आली नाहीच... मानवतेच्या पातळीवरुन घसरुन उकिरड्यात लोळायचे नसेल तर माणसामाणसात भेद निर्माण करणाऱ्या विषमतावादी वर्णश्रेष्ठत्ववादी व्यवस्थेचा नाद सोडा... असे विचार याप्रसंगी नागरिकांनी व्यक्त केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या