प्रज्ञासूर्य, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १८ तास अभ्यास करून अभिवादन तर वाचनातून देणार मानवंदना (Pragyasurya, the great man, will pay homage to Dr. Babasaheb Ambedkar by studying for 18 hours and will pay homage through reading.)

Vidyanshnewslive
By -
0
प्रज्ञासूर्य, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १८ तास अभ्यास करून अभिवादन तर वाचनातून देणार मानवंदना (Pragyasurya, the great man, will pay homage to Dr. Babasaheb Ambedkar by studying for 18 hours and will pay homage through reading.)


बल्लारपूर :- महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समितितर्फे "१८ तास सतत अभ्यास" हा उपक्रम आयोजित केला आहे. बाबासाहेब विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले असतांना १८-१८ तास अभ्यास करायचे. तोच आदर्श समोर ठेवून बाबासाहेबाना अभिवादन करण्याकरिता भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार, विद्यानगर बल्लारपुर येथे हा उपक्रम राबविन्यात येत आहे. या उपक्रमाची शुरुवात स. ६.०० वाजता होईल व रात्रि १२.०० वाजता सांगता होईल. तरी जास्तित जास्त संख्याने उपस्थित रहावे असे आव्हान तुलसीदास खैरे, संपत कोरड़े, जयदास भगत यांनी केले आहे.
           डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 134 व्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी बल्लारपूर शहरातील सर्व जनतेला सुचित करण्यात येते की दिनांक 13 एप्रिल 2025 या दिवशी सायंकाळी 7.00 वाजता ते रात्रौ 12.00 वाजेपर्यंत प्रत्येकाने पुस्तक घेऊन यावे व विद्यानगर वार्ड, पाली बुद्ध विहारासमोरील पटांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ रात्रौ 12: 00 वाजेपर्यंत वाचन करीत बसावे हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल. या कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी सहभाग घ्यावा ही विनंती. असे आवाहन प्रा.महेंद्र बेताल, सुरज दिलीप मून व समस्त विद्यानगर वार्ड येथील बांधव बल्लारपूर यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)