स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूरात जुगार अड्डयावर धाड लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch action, raid on gambling den in Ballarpur, seized valuables worth lakhs of rupees)
बल्लारपूर :- ११ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांचे आदेशाने पोस्टे बल्लारशाह हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना बल्लारपुर पेपरमीलच्या मागे, वर्धा नदीच्या काठी निखील रणदिवे रा. बल्लारपूर हा ५२ ताश कट पत्याचा जुगार अड्डा चालवीत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सापळा रचुन छापा मारला असता, घटनास्थळावर चंद्रपूर, राजुरा, बल्लारपुर येथील राहणारे एकुण ११ आरोपीस वतन लटारु कांबळे (31) बाबू पेठ चंद्रपूर, चंद्रशेखर निषाद आंबेडकर वॉर्ड बल्लारपूर, भारत भगवान भटकर बालाजी वॉर्ड बल्लारपूर, अवैक सुरेश इंदलवार लाल पेठ चंद्रपूर, कुमार स्वामी बदलया नेलया टिळक वॉर्ड बल्लारपूर, करण रामभाऊ पाध्ये, शिवाजी वॉर्ड विसापूर, रामसिंग राम भजन निसार गौरक्षण वॉर्ड बल्लारपूर, सुरेश इंद्रपाल केवट लाल पेठ चंद्रपूर ज्ञानेश्वर सुदर्शन तुराणकर शिवाजी वॉर्ड बल्लारपूर, शरपोधीन नन्हे शहा रामपूर राजुरा, ईश्वर सुधाकर ठाकरे आंबेडकर चौक राजुरा, निखिल रामदेव रामचंद्र रणदिवे श्रीराम वॉर्ड बल्लारपूर जुगार ५२ ताश कट पत्ता जुगार खेळत असतांना मिळुन आले. बल्लारपुर येथील पेपरमील च्या मागील वर्धा नदीच्या काठा वरील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ११ आरोपींना अटक करत १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई ११ एप्रिल रोजी करण्यात आली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, सफौ. धनराज करकाडे, पो.हवा. सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठ्ठावार, नितीन कुरेकार, पो.कॉ. प्रशांत नागोसे, शशांक बादमवार, प्रफुल गारघाटे यांनी केली आहे. जुगाराचे डावावर व त्यांचे अंगझडतीत एकुण १ लाख ७८ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला. ११ आरोपीस ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या