बल्लारपूर :- बल्लारपूर शहराला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते या सोबतच बल्लाशाह एक महत्वाचे रेल्वे जक्शन असून या ठिकाणी मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे व दक्षिण रेल्वे या झोनचे कार्य सुरळीत पणे सुरु असून महाराष्ट्रातील शेवटचे तर दक्षिण भारताचे प्रवेश द्वार म्हणून बल्लारशाह रेल्वे स्थानकाला ओळखले जाते या स्थानकावरून दररोज 50 प्रवासी गाड्यांचे आवागमन होत असते अशा ठिकाणी रेल्वे पोलीस निरीक्षक म्हणून सुनिल कुमार पाठक यांनी यशस्वी रित्या आपला 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला यानंतर त्यांची मुंबई येथे व्हिजिलेंस विभागात बदली झाली असून त्यांचे ठिकाणी नाशिक येथून संतोष कुमार राय यांची बल्लारशाह रेल्वे पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सुनिल कुमार पाठक यांनी आपल्या कार्यकाळात अनेक रेल्वे विषयक गुन्ह्याचा तपास यशस्वी रित्या पार पाडला होता.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या