महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागाद्वारे महिला दिनाच्या कार्यक्रमाच आयोजन (Women's Day program organized by Department of Sociology at Mahatma Jyotiba Phule College, Ballarpur)
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळद्वारा संचालित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागाद्वारे महिला दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन. दिनांक 8 मार्च 2025 महिला दिवसाच्या निमित्याने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले सभागृहात विद्यार्थ्यांसाठी विभिन्न कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा.डॉ. पंकज कावरे, प्रा. डॉ.पल्लवी जुनघरे, प्रा. सतीश कर्णासे, प्रा. विभावरी नखाते , प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. दिपक भगत, प्रा. जयेश गजरे उपस्थित होते. समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की समाजशास्त्र विभागाअंतर्गत महिला दिननिमित्त दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी विद्यार्थिनीच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने विभिन्न स्पर्धाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी वन मिनिट स्पर्धा, अंताक्षरी, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या व दरवर्षी अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी अशाच कार्यक्रमाचे आयोजन होत रहावे अशी सदिच्छा व्यक्त करून अभिनंदन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या