वन्यप्राण्याची शिकार करतांना वनविभागाद्वारे वनगुन्हात वापरलेले साहित्य व मुद्देमाल जप्त, बल्लारशाह वनविभागाची कारवाई (While hunting wild animals, forest department seizes materials and items used in forest crime, Ballarshah forest department action)

Vidyanshnewslive
By -
0
वन्यप्राण्याची शिकार करतांना वनविभागाद्वारे वनगुन्हात वापरलेले साहित्य व मुद्देमाल जप्त, बल्लारशाह वनविभागाची कारवाई (While hunting wild animals, forest department seizes materials and items used in forest crime, Ballarshah forest department action)


बल्लारपूर :- दिनाक 09 मार्च 2025 रोजी बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेष विसापुर 2 अंतर्गत येत असलेल्या राखीव वनखंड क्रमांक 489 मध्ये 3 इसम वनात पाण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने मे बसण्यात वनविभागाने मावलेल्या Garuda Al सिस्टम व्दारे जलर्ट मिळाला, त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक श्री मारशेडगे याचे नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह थी. नरेश रामचंद्र भोवरे हे आपले अधीनस्त वनकर्मचारी व पोलीस स्टेशन, रामनगर चंद्रपुर के पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत पहाटे 5.00 वाजताचे सुमारास जुनोना बाबूपेठ रोडवर सापळा रचण्यात आला. दरम्यान पहाटे 5.45 वाजताचे सुमारास दुचाकीने 3 इसम राखीव वनातुन बाहेर येत असतांना त्यांची दुचाकी थांबवून झडती घेत असतांना त्यानी सोबत बाळगलेने वन्यप्राणी साळींदर (Indian Porcupine) ने शव, एक भरमार बंदुक व दुचाकी मोटार सायकल बाजुला फेकुन अंधाराचा फायदा घेवुन वनाच्या दिशेने पसार झाले. मौक्यावर वनगुन्हात वापरण्यात आलेले साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आले. फरार आरोपींचा शोध घेण्याकरीता जुनोना फाटा, बाबुपेठ चंद्रपुर येथे वनविभाग व पोलीस विभागाचे पथक पाठविले असता मुकदर सिंग खजान सिंग टांक, रा.बाबूपेठ चंद्रपुर यांचे घरी शिकारी करीता वापरण्यात येणारे साहित्य व बंदुक लपवुन ठेवण्याचे गुप्त माहिती मिळाल्या वरुन नमुद इसमाचे घरी पंचासमक्ष घर पडती घेण्यात आली या मध्ये वन्यप्राण्याच्या शिकारी करीता वापरण्यात येणारे एजर मन व हत्यारे जप्त करण्यात आले व चौकशी करीता मुकदर सिंग खजान सिंग टांक यांना बोविश्वात जाले. साळींदर वन्यप्राण्याच्या शिकारी मध्ये फरार आरोपी 1) नामे समंदर सिंग खजान सिंग टांक, रा. बाबुपेठ 2) नामे अक्षय संतराम मडकाम, रा.बाबूपेठ ३) गुरुप्रीत समंदर सिंग टांक, रा.बाबुपेठ यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोपी विरुध्द बन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2,9,39,44,48 (a), 50 व 51 अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08967/224169 दिनाक 09.03.2025 अन्वये आरोपी 1) नामे समंदर सिंग खजान सिंग टांक, रा.बाबुपेठ 2) नामे अक्षय संतराम मडकाम, रा. बाबुपेठ 3) गुरुप्रीत समंदर सिंग टांक, रा.बाबुपेठ व 4) नामे मुकदर सिंग खजान सिंग टांक, रा. बाबुपेठ यांचे विरुध्द प्राथमिक वनगुन्हा जारी करण्यात आला. श्री. तेलंग, पशुधन विकास अधिकारी, राजुरा व श्री. कुंदन पोहचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांनी मृत साळीदर वन्यप्राण्याचे शवविच्छेदन करून मृत सायाळचे सिलबंद नमुने घेण्यात आले व त्यानंतर शवास पंचा समक्ष दहन करण्यात आले. सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चादा वनविभाग, चंद्रपुर ने उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्छु व यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेडगे हे करीत असुन फरार आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदर कार्यवाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नरोटे, क्षेत्र सहाय्यक बी. विजय रामटेके, श्री. अब्बास पठाण, श्री. कोमल घुगलोत व वनरक्षक कु. वैशाली जेणेरक, कुमाया पवार, कु.पुजा टोंगे, श्री.रजीत दुर्योधन, श्री. सुधीर बोकडे, श्री. अनील चौधरी, श्री.तानाजी कॉमले, बॉयोलॉजीस्ट मुर व पोलीस स्टेशन, रामनगर (चंद्रपुर) चे पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह प्रादे यांनी दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)