विहार एकत्रिकरण कृती समिती चंद्रपूर व भिक्षुसंघाच्या माध्यमातून महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (Vihar Integration Action Committee Chandrapur and through the Bhikshusangh, a statement to the District Collector regarding the liberation of Mahabodhi Mahavihar.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- दिनांक १७ मार्च २०२५ रोजी, महाबोधी महाविहार गया, बिहार या ठिकाणी होत असलेल्या बौद्ध भिख्खू यांच्या विहार मुक्ती च्या आंदोलनाला, विहार एकत्रीकरण कृती समिती बाबुपेठ मार्फत परिसरातील सर्व विहारांनी आणि मंडळांनी भंते करूनबोधी महाथेरो, भंते बुद्धशरन थेरो , भंते नागीतबोधी थेरो भंते मैत्री बोधी यांच्या नेतृत्वात मान. जिल्हाधिकारी साहेब यांना आंदोलनाच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले आणि वेळेच योग्य ती कार्यवाही न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलने व मोर्चे होतील असा इशारा देखील देण्यात आला या वेळेस, विहार एकत्रीकरण कृती समिती, बाबुपेठ चे सर्व कार्यकर्ते तसेच संघशील बौद्ध मंडळ, बाबुपेठ, श्रावस्ती बुध्द विहार, बाबुपेठ, पंचशील बुद्ध विहार, बाबुपेठ, त्रिरत्नं बौद्ध मंडळ, बाबुपेठ, प्रबुद्ध प्रगती बुद्ध विहार, बाबुपेठ, आम्रपाली भीमज्योत बौद्ध विहार, बाबुपेठ, कल्याणी बहुउद्देशीय महिला मंडळ, बाबुपेठ, सम्राट बौद्ध मंडळ , बाबुपेठ, गौतमी बौद्ध विहार, बाबुपेठ, सम्राट अशोक बुद्ध विहार, बाबुपेठ, प्रशिक महिला मंडळ, बाबुपेठ, तथागत सिद्धार्थ बहुउद्देशीय मंडळ, कल्याणी बहुउद्देशीय मंडळ, अशोक बहुउद्देशीय मंडळ, बाबुपेठ, प्रबुद्ध पंच मंडळ, बाबुपेठ, बहुद्देशीय त्रीशरन बुद्ध मंडळ आणी भीमाबाई महिला मंडळचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तथा असंख्य उपासक उपासिका उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)