बल्लारपूर :- स्थानिक गुरुनानक विज्ञान महाविद्यालयातील जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गोपाल गोंड नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. बहिरवार होते. याप्रसंगी सत्कार मूर्ती डॉक्टर गोंड म्हणाले," सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य खरे तर आव्हान आहे. या क्षणानंतर आयुष्याला वेगळेच वळण लागत असते. पण जीवनातील आनंददायी क्षणाचा शोध घेतला की, आयुष्य सुखमय होते; यावर माझा विश्वास आहे." शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना डॉ. बहिरवार म्हणाले ,डॉ. गोंड यांनी शिक्षकी पेशाला न्याय दिला. त्यांच्या संशोधनवृत्तीने आणि अध्यापन कौशल्याने अनेक विद्यार्थी प्रेरित होऊन उच्चपदस्थ झाले .नवीन पिढीतील शिक्षकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. इथून ते प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले असले तरी पोंभुर्णा येथील चिंतामणी महाविद्यालयात प्राचार्य पदी त्यांची निवड झाल्याने त्यांचे महाविद्यालय व्यवस्थापन, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीवृंदातर्फे अभिनंदन करतो." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री गवते यांनी केले तर आभार अपर्णा दुर्गे यांनी मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या