कुष्ठरोग जनजागृतीसाठी 16 मार्च रोजी आंनदवनात “रन फॉर लेप्रसी” चे आयोजन (Organized “Run for Leprosy” at Anandavan on March 16 for leprosy awareness)

Vidyanshnewslive
By -
0
कुष्ठरोग जनजागृतीसाठी 16 मार्च रोजी आंनदवनात “रन फॉर लेप्रसी” चे आयोजन (Organized “Run for Leprosy” at Anandavan on March 16 for leprosy awareness)

चंद्रपूर :-  सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याकरीता चंद्रपूर जिल्हयात स्पर्श -2025 अंतर्गत कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यात विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) चंद्रपूर, तालुका आरोग्य अधिकारी, वरोरा व महारोगी सेवा समिती संचालीत आनंद निकेतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 'रन फॉर लेप्रसी' मॅराथॅानचे आयोजन 16 मार्च 2025 ला सकाळी 7 वाजता आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे करण्यात आलेले आहे. स्पर्धकांनी सकाळी 6.30 वाजता मॅराथॉन ठिकाणी उपस्थित राहावे. या मॅराथॉन स्पर्धेत 15 वर्षावरील सर्व मुला- मुलींना सहभाग घेता येणार असून माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्व सामान्य नागरीक , कुष्ठरोगाबाबत कार्य करणाऱ्या स्वयंसेवा संस्था, शासनाचे विविध विभाग , डॉक्टर संघटना , पुरस्कार प्राप्त खेळाडु, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांचाही समावेश राहणार आहे. सदर मॅराथॉन करीता Free Registration Scanner उपलब्ध करूण देण्यात आले आहे. त्याद्वारे विनामुल्य नोंदणी करायची आहे. स्पर्श कुष्ठरोग अभियाना अंतर्गत या वर्षीचे घोषवाक्य “कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती वृध्दींगत करु, त्याबाबतचा गैरसमज दूर करू व कुष्ठरोगाने बाधित एकही व्यक्ती राहणार नाही याची दक्षता घेऊ” या उपक्रमात नागरीकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे , महारोगी सेवा समिती आंनदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) चंद्रपूर चे डॉ. संदीप गेडाम यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)