स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, चंद्रपूरात एम. डी. पावडर विकतांना 2 व्यक्तींना मुद्देमालासह अटक, 1 आरोपी फरार (Action of local crime branch, in Chandrapur. 2 persons arrested while selling M. D. powder, 1 accused absconding)
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने गोपनिय माहितीचे आधारे पोलीस ठाणे चंद्रपूर शहर हद्दीतील महाकाली कॉलरी रेती बंकर जवळ नाकेबंदी करुन दुचाकी होंडा ॲक्टीवा मोपेड गाडी व बुलेट मोटार सायकलवरुन येणारे इसमांना थांबवुन त्यांची झडती घेतली असता आरोपी जुनेद आवेश शेख यांचे ताब्यात ५.५६ ग्रॅम एम.डी. ड्रग्स पावडर, तसेच आरोपी वृषभ धोंगडे याचे ताब्यात ३.५९ ग्रॅम एम.डी. ड्रग्स पावडर मिळुन आल्याने दोन्ही आरोपी आणि पाहीजे असलेला आरोपी नामे कालु पठाण असे तिघांविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम ८ (क) २२ (ब) गुंगीकारक मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियिम १९८५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन गुन्हयात एम.डी. ड्रग्स पावडर, अॅक्टीवा मोपेड, बुलेट मोटार सायकल व दोन मोबाईल असा एकुण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चंद्रपूर शहरात एम डी पावडर विकणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केले असून एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून ९.१५ ग्राम एम डी पावडर सहित ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. सदर कारवाई २० मार्च, २०२५ रोजी करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सपोनि दिपक कांक्रेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, प्रमोद कोटनाके, पोअं. गोपीनाथ नरोटे व चापोहवा दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या