महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा रजत महोत्सव व पदाधिकारी मेळावा तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा (Maharashtra State Marathi Journalist Association's Silver Jubilee and functionaries meeting and Abhishtachintan ceremony on the occasion of birthday of Maharashtra State Vice President of Maharashtra State Marathi Journalist Association Prof. Mahesh Panse)
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या रजत महोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळाव्याचे दि.३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात भद्रावती येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बापुराव बोदकुलवार राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे राहणार आहेत. सत्कारमूर्ती म्हणून वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणराव संजय देवतळे राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष निलेश सोमानी हे मुख्य अतिथी राहणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून एन.आय.टी.नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश कातडे, वनप्रकल्प विभाग चंद्रपूरचे सहव्यवस्थापक स्वप्निल मरस्कोल्हे,तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर, पं.स.चे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ,भद्रावती पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल काचोरे, महा. प्रांतिक तैलिक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, भद्रावती न.प.चे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वरोरा न.प.चे माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, मानवाधिकार साहाय्यता संस्थानचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख विनायक गरमडे, दैनिक महासागरचे जिल्हा संपादक प्रवीण बतकी, प्रा.ॲड.नाहिद हुसेन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रजत महोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळाव्याला राज्यातील, विदर्भातील, जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सदस्यगण व पत्रकार बंधु यांना आंमत्रित करण्यात आले आहे. याप्रसंगी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना संघटन कौशल्य सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या विदर्भ, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सदस्य, सोबतच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या