चंद्रपूर बायपास मार्गांवर भिषण अपघात, कार ची दुचाकीला धडक, 1 मृत्यू (Fatal accident on Chandrapur bypass roads, car collides with two-wheeler, 1 dead)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर बायपास मार्गांवर भिषण अपघात, कार ची दुचाकीला धडक, 1 मृत्यू (Fatal accident on Chandrapur bypass roads, car collides with two-wheeler, 1 dead)


चंद्रपूर :- चद्रपुरातील बायपास मार्गावर 2 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनाला जबर धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला, अपघातानंतर कार चालक घटनस्थळावरून पसार झाला. दुचाकी वाहन क्रमांक MH34G 6197 हे चंद्रपूर वरून बल्लारपूर च्या दिशेने जात होते त्यावेळी जुनोना मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाले होते मात्र चालकाने वाहन विरुद्ध दिशेने टाकले, अतिवेगात असलेल्या चारचाकी वाहनाने आधी मार्गावर उभ्या असलेल्या स्कुल बस ला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित कार दुचाकी ला धडकली, धडक इतकी जबर होती की दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला पडला, या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. कार चालक घटनास्थळावरून पसार झाला मृतकाचे नाव अद्याप कळू शकले नाही. रामनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)