चंद्रपूर :- सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र ठरलेल्या परंतु खात्यामध्ये रक्कम जमा न झालेल्या लाथार्थ्यांनी बँक खात्याशी आधारकार्ड संलग्न करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता/दुर्बलतेनुसार चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपाड स्टिक, व्हील चेयर, फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये लाभ देण्यात येतो. मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत पात्र जेष्ठ नागरिकांना (D.B.T.) प्रणालीद्वारे लाभ देण्यात आलेला आहे. मात्र जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत, परंतु त्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न झाला नाही किंवा आधार मॅपिंग झालेले नाही, तसेच काही लाभार्थ्यांचे आधार कार्ड ॲक्टीव्ह नाहीत, अशा पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खात्याशी आधार नंबर संलग्न करावे, आवाहन असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या