आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते ३८ व्या महाराष्ट्र प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संस्थेच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन, स्त्री रोग तज्ज्ञांमध्ये देश घडविण्याचे सामर्थ्य आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (MLA. Mungantiwar inaugurated the 38th Maharashtra Obstetrics and Gynecologist Institute's annual conference, MLA Shri. Sudhir Mungantiwar)
चंद्रपूर - स्त्री ही जन्मदात्री आहे. असंख्य कळा आणि प्रचंड त्रास भोगून ती एक जीव या जगात घेऊन येते. असंख्य त्रास भोगूनही बाळाला पाहताच स्त्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा लाखमोलाचा असतो. हा आनंद निर्माण करण्यासाठी स्त्री रोग तज्ञाची महत्त्वाची भुमिका असते. या स्त्री रोग तज्ज्ञांमध्ये देश घडविण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर येथील मुल रोडवरील प्रभा हॉल वनअकादमी येथे आयोजित ३८वी महाराष्ट्र प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संस्थेची वार्षिक परिषदमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. किरणजी कुर्णकोटरी, सचिव डॉ. बिपिन पंडीत, डॉ. सुनिता तांदूळवाडकर, डॉ. अभय पुरंदरे, डॉ. निलेश बलकवडे, डॉ. भारती अभ्यंकर, डॉ. माधुरी मेहेंदळे, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. रविंद्र परदेसी, आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. मनीषा घाटे, सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. नगिना नायडु, डॉ. रोहन पालशेतकर, डॉ. रवि आलुरवार, डॉ. अमित देवईकर आदी उपस्थित होते.
बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्यावर संस्कार होतात व पुढे त्याची वागणूक देखील त्या दृष्टीनेच होते. यात आईंसोबतच स्त्री रोग तज्ञ या परिषदेतून योग्य दिशा देऊ शकल्यास देश घडविण्यात मोठे योगदान लाभेल, असेही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तीन दिवसीय परिषदेत वेगवेगळ्या विषयावर उत्तम चर्चा होऊन त्याचा उपयोग समाजाची सेवा करताना डॉक्टरांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महारोग्यांच्या आयुष्यात आनंदवन फुलविणाऱ्या बाबा आमटे यांच्या सेवेची चंद्रपूर ही भूमी आहे. समाजामध्ये जागरूकता पसरविण्यासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून सेलिब्रिटींशी संवाद साधण्याबाबत देखील आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वस्त केले. स्त्री ही जन्मदात्री आहे. असंख्य कळा आणि प्रचंड त्रास भोगून ती एक जीव या जगात घेऊन येते. असंख्य त्रास भोगूनही बाळाला पाहताच स्त्रीच्या चेहऱ्यावर पसरणारा आनंद हा लाखमोलाचा असतो. हा आनंद, हे सुख निर्माण करण्याची क्षमता स्त्री रोग तज्ञांमध्ये आहे. परिषदेत स्त्री रोग आणि पुनरुत्पादन आरोग्य, गर्भधारणा आणि प्रसूती व्यवस्थापन, गर्भाशय आणि अंडाशयाचे आजार, मेनोपॉज आणि वृद्ध स्त्री यांचे आरोग्य, कर्करोग आणि गुप्तरोग, गर्भधारणा आणि कुटुंब नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन, मानसिक आरोग्य आणि स्त्रियांचे आरोग्य, क्लिनिकल अनुभव आणि केस स्टडीज अशा विभिन्न विषयावर मंथन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. वाघांची भूमी, आनंदवनाची भूमी, स्वातंत्र्यलढ्यात अग्रस्थानी असलेली चंद्रपूरची भूमी परिवर्तनाची साक्षीदार आहे. त्यामुळे ही परीषद आरोग्यसेवेसाठी निश्चितच नवी दिशा ठरेल, असा विश्वासही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या