चंद्रपूर :- पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथील 14 वर्षाच्या मुलीला जीबी सिंड्रोम आजाराने ग्रासले असल्याची माहिती नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य यंत्रणेला नुकतीच प्राप्त झाली. या पार्श्वभुमीवर आरोग्य विभागाद्वारे चेकठाणेवासना येथे सर्वेक्षण करण्यात आले. या अंतर्गत गावातील 192 घरांना भेटी देऊन 904 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकही जीबी सिंड्रोम सदृश्य रुग्ण आढळून आला नसून गावातील 11 पाणी नमुने जैविक तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. सद्यस्थितीत पाण्याचे जैविक तपासणीचे अहवाल अप्राप्त आहे. तसेच चेकठाणेवासना येथील ग्रामपंचायतमधील ब्लिचिंग पावडरचे नमुने सुध्दा चंद्रपूर येथे तपासणीस पाठविण्यात आले आहे. दरम्यान जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता रुग्णाची परिस्थिती सुधारत असून लवकरच रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या