वन्यप्राण्याच्या धडक दिल्याने पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू, अब्दुल कलाम बागेजवळची घटना (Unfortunate death of police constable due to attack by wild animal, incident near Abdul Kalam Bagh)

Vidyanshnewslive
By -
0
वन्यप्राण्याच्या धडक दिल्याने पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू, अब्दुल कलाम बागेजवळची घटना (Unfortunate death of police constable due to attack by wild animal, incident near Abdul Kalam Bagh)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस हवालदार येथील महामार्ग विभागात कार्यरत पोलीस हवालदार चे वन्यप्राण्याच्या धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश उध्दव कुळसंगे (३६) वर्ष असे मृतक पोलिसांचे नाव आहे. हायवे विभागात कार्यरत पोलीस हवालदार मंगेश उध्दव कुळसंगे हे १३ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर येथील दुर्गादेवी विसर्जन करीता बंदोबस्त ड्युटी करिता आले होते. ते रात्री आपली कर्तव्य पूर्ण करून चंद्रपूर ला घरी परत जात असताना अब्दुल कलाम बगीचा जवळ त्यांना अज्ञात वन्य प्राण्याने धडक दिल्याने त्यांच्या दुचाकीचे संतुलन बिघडले. त्यात ते घसरून पडल्याने डिवाइडर ला आदळले. त्यात त्यांच्या पोटाला जबर मार बसल्याची माहिती असून त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यात त्यांची आज सकाळी उपचारा दरम्यान प्राणज्योत मावळली. आज सायंकाळी त्यांच्या मूळ गावी टेंबुरवाही तालुका राजुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, ७ वर्षीय मुलगा व २ वर्षीय मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)