बल्लारपूर येथे भारतीय ओबीसी महापरिषद व ओबीसी योद्धांचा सत्कार तसेच प्रा शाम मानव यांचे प्रबोधन पर व्याख्यान संपन्न (In Ballarpur, Indian OBC General Council and felicitation of OBC warriors and lecture on enlightenment by Prof. Sham Manav was held.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर येथे भारतीय ओबीसी महापरिषद व ओबीसी योद्धांचा सत्कार तसेच प्रा शाम मानव यांचे प्रबोधन पर व्याख्यान संपन्न 


बल्लारपूर :- दिनांक 14 ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी पाच ते आठ दरम्यान बल्लारपूर येथील राजे बलाळशाह नाट्यगृहामध्ये ओबीसींची एक दिवसीय महापरिषद संपन्न झाली ह्या परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार श्री सुधाकर जी अडबाले यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष म्हणून माजी आमदार देवरावजी भांडेकर उपस्थित होते. यावेळी ओबीसींचे विषय विविध प्रश्न जसे-ओबीसींची जातनिहाय जनगणना, ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचा प्रश्न तसेच लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ओबीसींसाठीचा बजेट मधील वाटा त्यासोबतच क्रिमिलियरची असंविधानिक अट रद्द करण्याचे ठराव घेण्यात आले. 

 
       या परिषदेला प्रास्ताविकामध्ये बोलताना आयोजक व भारतीय ओबीसी महापरिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय घाटे यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका व ग्रामीण क्षेत्रातील समस्या जसे -ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जंगली जनावरामुळे होणारे शेतीचे व जान -मालचे होणारे नुकसान तसेच, जिल्ह्यात मोठ मोठ्या नद्या असून सिंचनाची कुठलीही सोय नसल्याबाबतची खंत व्यक्त केली. बेरोजगारांसाठी कुठल्याही प्रकारची कायमस्वरूपी रोजगार नियोजन आत्तापर्यंत झाले नाही हे सुद्धा त्यांनी मांडले. सीटीपीएस मुळे चंद्रपूर व बिल्ट व डब्लू सी एल च्या खाणीमुळे बल्लारपूर येथील प्रदूषणाचा प्रश्न त्यांनी मांडला. महापरिषदे दरम्यान ओबीसींच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करणारे- माननीय रवींद्र टोगे ,माननीय भुजंग भाऊ ढोले, माननीय सुरेशजी कावळे, एडवोकेट अंजलीताई साळवे व उमेश जी कोराम यांचा ओबीसी योद्धे म्हणून सत्कार करण्यात आले. परिषदेच्या शेवटी प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक श्याम मानव यांचे संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या मोहिमेअंतर्गत " भारतीय संविधान व ओबीसींची दशा व दिशा " या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण प्रबोधन केले. कार्यक्रमाला सभागृहामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी तसेच बहुजन बांधव व इतर मान्यवर आणि पत्रकार बांधवाची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)