बल्लारपूरात सलग तिसऱ्या दिवशी तलवार जप्त, बल्लारपूर पोलिसांची कारवाई (Sword seized in Ballarpur for the third day in a row, Ballarpur police action)
बल्लारपूर -: आरोपी नामे मोहम्मद कासीम शाह वय 24 वर्षे धंदा- मजुरी रा. डॉ. झाकीर हुसेन वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर याचेवर कलम 4, 25 आर्म अक्ट अन्वये गुन्हा नोंद होणेबाबत. सविनय सादर आहे की, आम्ही पोउपनि. हुसेन शहा पोलीस ठाणे बल्लारपुर आज दि. 22/09/2024 रोजी आम्ही सोबत पोस्टॉप सपोनि. दिपक कांक्रेडवार सा., पोहवा. रणविजय ठाकूर/2261, सुनिल कामतकर / 957. पुरूषोत्तम चिकाटे/2182, सत्यवान कोटनाके ब.नं. 2346, संतोषे दंडेवार/2297, पोअं. वशिष्ट रंगारी /187, मिलिंद ब.नं. 2756, नपोअं. अजितना / 1448 सह पोस्टे. साना क्र. 35/24 चे 18/01 वा. अन्वये पोस्टे. हद्दीत बाजार पेट्रोलीग करीत असता मुखबीरव्दारे खबर मिळाली की, डॉ. झाकीर हुसेन वार्ड बल्लारपुर येथे राहणारा मोहम्मद शाह हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आपले जवळ लोखंडी तलवार बाळगून आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्यावरून पंचाना यांना नगर परीषद चौक येथे बोलावून खबरेची माहीती देवून पंच म्हणून हजर राहण्याबाबत कळविल्यावरून पंच सहमत होवून हजर आल्याने आम्ही स्वतः सोबत पोस्टॉप. व पंचासह मोहम्मद शाह याचे डॉ. झाकीर हुसेन वार्ड येथील घरासमोर जावून आवाज दिला असता एक ईसम घरा बाहेर आला त्यास आमचा व पंचाचा परिचय देवून नाव पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव मोहम्मद कासीम शाह वय 24 वर्षे जातः मुसलमान धंदा- मजुरी रा. डॉ. झाकीर हुसेन वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर असे सांगीतले वरून त्यास लोखंडी तलवार बाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले वरून पंचासमक्ष त्याचे घराची झडती घेतली असता घरातील मधल्या खोलीतील सज्जावर लोखंडी तलवार मिळून आली. त्याबाबत त्यास लोखंडी तलवार बाळगण्याचा परवाना विचारला असता कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले वरून सदर तलवार पंचा समक्ष ताब्यात घेवून मोजमाप केला तो खालीलप्रमाणे. 1) 500 = 00 एक लोखंडी तलवार एकूण लांबी 69 सेमी. असून मुठ पासुन पात्याची लांबी 53 सेमी. आहे. व पात्यापासुन लोखंडी मुठची लांबी 16 सेमी. असुन मुठला लोखंडी गार्ड आहे. पात्याची रूंदी मध्यभागी 5 सेमी. असुन समोर टोकदार धार असलेली कि. अंदा. वरील प्रमाणे लोखंडी तलवार आरोपीचे ताब्यात मिळून आल्याने पंचासमक्ष घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे जप्त करून जप्त मुद्येमाल व आरोपीसह पोस्टेला परत आलो. नमुद आरोपी हा आपले जवळ लोखंडी तलवार बाळगुन लोकामध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने बाळगुन असतांना मिळून आल्याने त्याचे कृत्य कलम 4, 25 आर्म अक्ट अन्वये होत असल्याने त्याचेवर कार्यवाही होणेस माझी कायदेशीर फिर्याद आहे. तपासी अधिकारी हुसेन कादर शहा पोलीस उप निरीक्षक पोलीस ठाणे बल्लारपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे बल्लारपूर पोलिसांनी सलग तीन दिवसात तीन तलवार जप्त केल्याची माहिती आहे 20 सप्टेंबर ला लोकमान्य टिळक वॉर्डात वेकोली क्वार्टर परिसरात तील एक, तर 21 सप्टेंबरला सुभाष वार्ड येथील जोक्कू नाला परिसरातील एक अशा 2 तलवार जप्त केल्या असून 2 आरोपीना यापूर्वीच अटक केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या