बल्लारपूरात आत्महत्याचं सत्र थांबेना, पुन्हा एका अनोळखी व्यक्तीची BTS प्लॉट जवळ रेल्वेने कटून आत्महत्या (The suicide season in Ballarpur does not stop, again an unknown person commits suicide by being cut by a train near the BTS plot)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात आत्महत्याचं सत्र थांबेना, पुन्हा एका अनोळखी व्यक्तीची BTS प्लॉट जवळ रेल्वेने कटून आत्महत्या, ओळख पटविण्याचे बल्लारपूर पोलिसाचे आवाहन (Suicide season continues in Ballarpur, another stranger commits suicide near BTS plot, Ballarpur police appeals for identification)
बल्लारपूर :- दीनांक 05/04/24 रोजी BTS प्लॉट जवळ एक अज्ञात इसम वय अंदाजे 30-35 वर्ष,गहू वर्ण, उंची अंदाजे 5 फुट,  अंगात नेव्ही ब्लू रंगाचा चेक्स असलेला शर्ट व कळ्या रंगाची पॅन्ट घातलेली असून सदर इसमाच्या उजव्या हातावर मोरपंख व बासुरी काढलेली असून Vicky असे इंग्रजीमध्ये लिहिलेले आहे व डाव्या हातावर सुद्धा Vicky असे इंग्रजीमध्ये गोंदलेले आहे तसेच उजव्या हातामध्ये पांढऱ्या रंगाचे स्टीलचे कडे आहे . वर्णनाच्या इसमाने रेल्वेने रूळावर आत्महत्या केली आहे त्याचे शव उपजिल्हा रुग्णालय बल्लारपूर येथे शवगृहात ठेवण्यात आले आहे. सदर मयत इसमाची अद्याप पावेतो ओळख पटली नसल्याने सदर अनोळखी इसमाबाबत आपल्या वृत्तपत्रात बातमी छापुन ओळख पटविण्यासाठी सहकार्य करावे. अशी विनंती. बल्लारपूर पोलीस स्टेशन द्वारे करण्यात आली असून ओळख पटल्यास नागरिकांनी PSI चाटे पोस्टे बल्लारपूर मो न 9860601816 संपर्क साधावा असे आवाहन श्री आसिफराजा शेख पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)