संविधानाचे संरक्षण सामुहिक जबाबदारी - प्रा. श्याम मानव, बल्लारपुरात पार पडला ओबीसी परिषद ओबीसी योद्धांचा करण्यात आला सत्कार (Protection of the Constitution Collective Responsibility - Prof. Shyam Manav, OBC conference held in Ballarpur OBC warriors were felicitated)

Vidyanshnewslive
By -
0
संविधानाचे संरक्षण सामुहिक जबाबदारी - प्रा. श्याम मानव, बल्लारपुरात पार पडला ओबीसी परिषद ओबीसी योद्धांचा करण्यात आला सत्कार (Protection of the Constitution Collective Responsibility - Prof. Shyam Manav, OBC conference held in Ballarpur OBC warriors were felicitated)


बल्लारपूर : भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. संविधानामुळे आपणास अधिकार मिळाले आहे. आजघडीला संविधानात्मक बाबीवर प्रहार केला जात आहे. संविधानाची चौकट नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजमनावर विपरीत परिणाम होत आहे. राजकीय, सामाजिक व आर्थिक मार्ग अडवला जात आहे. आता आपल्याला संविधान संरक्षण करण्यासाठी सामुहिक जबाबदारी स्विकारावी लागेल. तरच संविधान कायम राहील, असे विचार प्रसिद्ध वक्ते, राजकीय विश्लेषक आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी बल्लारपुरात ओबीसी परिषदेत सोमवार (दि. १४) रोजी मांडले. समता पर्वाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय घाटे यांच्या माध्यमातून ओबीसी परिषद, ओबीसी योद्धांचा सत्कार आणि प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी संविधान बचाव ! महाराष्ट्र बचाव परिषदेत ते बोलत होते. 

 
         आपणाला सामाजिक न्यायाची लढाई लढावी लागेल - डॉ. संजय घाटे आपण शहरी व ग्रामीण भागात विभागले आहोत. सिंचन सुविधांचा अभाव आहे. परिणामी शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. उद्योगामुळे प्रदूषण समस्या आहे. यातून आरोग्य समस्या वाढत आहे. आपले क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने मानव वन्य प्राणी संघर्ष निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी सामाजिक लोकशाहीच्या माध्यमातून आपणास लढाई लढावी लागणार असून ओबीसींच्या न्यायासाठी व संविधानाच्या बचावासाठी आपला संघर्ष सुरू राहणार असल्याचे मत ओबीसी परिषदेचे आयोजक व ओबीसी महापरिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे यांनी प्रास्ताविकात भूमिका मांडली. विधानपरिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवराव भांडेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. श्याम मानव, आयोजक डॉ. संजय घाटे, डॉ. रजनी हजारे, अड. मेघा भाले, सत्कारमूर्ती म्हणून ओबीसी यौद्धे रविंद्र टोंगे, भुजंग ढोले, सुरेश कावळे, अड. अंजली साळवे, उमेश कोर्राम यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)