चंद्रपूर :- रस्त्यावरील चहाच्या टपरी वर एखादा लोकप्रिय खासदार अचानक येत असेल. आणि चहा प्यायला आले म्हणत असेल तर टपरी धारकांची तारांबळ उडाल्या शिवाय राहणार नाही. लहान टपरी चालवीणाऱ्या टपरी धारकांची स्थिती, मनस्थिती आणि टपरी वरील पेय, खाद्य अधिकच चवदार होऊन जाते. याचा आस्वाद रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी घेतला होता. छत्रपती शाहू महाराजांची बग्गी अचानक कोल्हापूर च्या कांबळेच्या टपरी पुढे येऊन थांबते. महाराज सरळ कांबळे च्या टपरी वर येतात आणि भजी बनवायला सांगतात. कांबळे ची तारांबळ होते. दलित टपरी धारकांच्या समोर महाराज असतात. बसायला बरोबर जागा नाही. काय करावे काहीच कळत नाही. तशीच स्थिती चंद्रपूर च्या मध्यभागी असलेल्या जयंत टॉकीज, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौकात गोपी च्या चहा टपरी वर गोपी ची झाली. अचानक लोकप्रिय खासदार प्रतिभा ताई धानोरकर आल्यात. आणि चहा मागितला. खासदारांना चहा घ्यायचा असता तर शहरात मोठमोठी वातानुकुलीत हॉटेल आहेत. तिथेही निवांत बसून चहा पिता आले असते. परंतु गोपी च्या टपरी वरच का..? त्याचे उत्तर छत्रपती शाहू महाराजांनी आधीच दिले. शाहू महाराजांना अनेक लोकांनी कांबळे च्या टपरी वर बसने आणि भजी खाण्या बाबत ना पसंती व्यक्त केली. तत्कालीन जातीभेद, वर्ण व्यवस्था वर प्रहार करायचे असेल आणि वंचित घटक असलेल्या आपल्या प्रजेची आर्थिक परिस्थिती सुधरवाया हाथ भार लावायचा असेल तर केवळ आर्थिक मदत करून चालणार नाही. ग्राहक म्हणून आपल्याला तिथे जावं लागेल तेव्हाच हा विषमतेचा डोंगर कोसळून खाली पडेल. हे ना पसंती व्यक्त करणाऱ्या लोकांना शाहू महाराजांनी सांगितले.नेमका शाहू महाराजांचा हाच विचार पुढे नेण्यासाठी खासदार प्रतिभा ताई पुढे आल्यात.. गोपी ला निवडणुकीच्या वेळी मी निवडणूक जिंकल्या नंतर तुझ्या टपरी वर येऊन चहा पिणार असे सांगितले होते. निवडणूक झाली. ताई मोठया मताधिक्याने निवडून आल्यात. संसदेच्या कामात खासदार म्हणून रमल्यात. गोपी पण हे विसरला. आज अचानक खासदार प्रतिभा ताई धानोरकर गोपी च्या टपरी वर आल्यात. चहाची मागणी केली. चहा घेतल्या नंतर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांना चहा चे पैसे द्यायला लावलेत. हा प्रसंग अनेक लोकं उघड्या डोळ्यांनी पाहत होते शाहू महाराजांच्या विचारांचा वसा पुढे नेणाऱ्या खासदारांचे कौतुक केल्या जात आहे.
संकलन :- पवन भगत, बल्लारपूर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या