बल्लारपूरात भिषण अपघात, हायवा ट्रक च्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी (Horrific accident in Ballarpur, one killed and one seriously injured in a collision with a Haiva truck)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात भिषण अपघात, हायवा ट्रक च्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी (Horrific accident in Ballarpur, one killed and one seriously injured in a collision with a Haiva truck)


बल्लारपूर :- बल्लारपुर शहरातील पेपर मिल गुलमोहर पार्क समोर पेपर मिल गेट नं. 7 जवळच्या मार्गाजवळ भीषण अपघाताची घटना आज सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. बल्लारपुर मध्ये राहणाऱ्या बहीणीच्या घरी स्कूटीने डबल सीट येत असताना पेपर मिल गेट नं 7 जवळ अपघात घटना घडली. मागुन भरधाव येणाऱ्या एका हायवा ट्रक ने दुचाकीला मागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला होता आणि एक गंभीर जखमी झाला आहे. मृतकाचे नाव गोलु राजु उमरगुंडावार वर्ष (24) रा.घोडपेट, भद्रावती, बल्लारपुर येथे अपघात गुलमोहर पार्क, पेपर मिल गेट नं 7 जवळ कलामंदिर जवळपास अज्ञात हायवा ट्रक ने मागुन धडक दिल्याने गोलु उमरगुंडावार यांच्या जागीच मृत्यू झाला. तर दुसरा सतिश अशोक लोखंडे (34) रा.मातर देवी वार्ड, घुग्घुस. हे गंभीर जखमी आहे. यांच्या बल्लारपुर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपुर येथून स्कुटी क्रमांक नंबर MH 34 AW 6107 या दुचाकी गाडी ने डबल सीट येताना बल्लारपुर पेपर मिल जवळ गुलमोहर पार्क जवळ एक अज्ञात हायवा ट्रक ने मागून स्कुटीला धडक दिल्याने स्कुटी चालक जागीच मरण पावला दुसरा गंभीर जखमी आहे. बल्लारपूर पोलीस यांना सूचना मिळताच घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालय पाठवले. पुढील कार्यवाही बल्लारपूर पोलीस करीत आहे. बातमी लिहिले पर्यंत हायवा ट्रक च्या शोध लागला नाही. या संबंधीचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)