बल्लारपूर :- बल्लारशाह - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस मार्गे (नांदेड औरंगाबाद) बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून उद्या १६ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याची सेवा दररोज असेल. बल्लारशाह येथून सकाळी 8:30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 22 तासांनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मुंबईला पोहोचेल. त्याबद्दल पालकमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज भैय्या अहिर यांचे मनःपूर्वक आभार. वास्तविक, बल्लारशाह ते मुंबईमार्गे वर्धा अशी रेल्वेची मागणी होती.परंतु रेल्वे मंत्रालयाने ही मागणी अंशत: मान्य करत नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशाह ते मुंबई (व्हाया नांदेड मार्गे) चालवण्याचा निर्णय घेतला. पूर्वी ही रेल्वे नागपूर ते मुंबई धावत असे. कोविड काळात, ते आदिलाबादहून मुंबईला हलवण्यात आले. अशी माहिती अजय दुबे सदस्य झेडआरयुसीसी मध्य रेल्वे झोन मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या