बल्लारपूर पोलीसांनी किल्ला वार्ड येथील मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश एका आठवडयात केला, 3 आरोपीना अटक केल्याची माहिती (Ballarpur Police busted a major burglary in Killa Ward in a week, 3 accused arrested.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलीसांनी किल्ला वार्ड येथील मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश एका आठवडयात केला, 3 आरोपीना अटक केल्याची माहिती (Ballarpur Police busted a major burglary in Killa Ward in a week, 3 accused arrested.)


बल्लारपूर :- उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन श्रीहरी सातपूते, वय 69 वर्ष, रा किल्ला वार्ड, बल्लारपूर, जि चंद्रपूर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टप्रमाणे त्यांचे राहते घरातून अज्ञात इसमांनी दि. 12/09/2024 रोजी दुपारी 12/00 वा. ते दि. 13/09/2024 रोजी सकाळी 03/00 वा. दरम्यान घरफोडी चोरी करून एकूण सोन्याचे दागिने अंदाजे 139 ग्रॅम, व चांदीचे दागिणे 250 ग्रॅम, व रोख रक्कम 2,000/-रू, असा एकुण 8 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल घेवून पसार झाल्यावरून पो स्टे ला अप. क. 889/2024 कलम 305 (ए), 331(3), 331 (4) मा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान बल्लारपूर पोलीसांनी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष दर्शी साक्षिदार यांचे बयान व गुप्त माहीती वरून सदर प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकाला कायदेशीर कियारितीप्रमाणे ताब्यात घेवून तपास करण्यात आला व त्या दिशेने तंत्रशुध्द पध्दतीने तपास करून सदर गुन्हयात आरोपी क. 01) सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे वय 28 वर्षे, रा. सोमनाथपुरा वार्ड, राजुरा, ता. राजुरा, जि. चंद्रपुर आरोपी क 02) दर्शन उर्फ तेलंग अशोक तेलंग, वय 23 वर्ष, रा. मौलाना आझाद वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर क.03) विकास अजय शर्मा, वय 25 वर्ष, रा. कमला नगर, वडसा (देसाईगंज) जि गडचिरोली यांना अटक करून वर नमूद तिन्ही आरोपितांकडून सोन्याचे दागिणे अंदाजे 130.280 ग्रॅम, एकूण कि. 7,83,480/-रू, चांदीचे दागिणे 96 ग्रॅम, एकुण कि. 9,600/-रू, रोख रक्कम 27,000/-रू, असा एकूण 8,20,080/-रू. चा मुद्देमाल, हस्तगत केला आहे


            सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, श्री. दिपक साखरे सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, स.पो.नि. अंबादास टोपले, पो.उप. निरिक्षक हुसेन शहा, स.फौ.गजानन डोईफोडे, आनंद पारचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माधनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वसिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, मु.पो. अंमलदार अनिता नायडू तसेच चालक पो अंमलदार वामन शेंडे, भाष्कर कुंदावार, परमविर यादव, कैलाश चिंचवलकर, विकास खंडार, विना एलकुलवार इत्याड़ी पो. स्टाफ तसेच सायबर सेल, चंद्रपूर यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)