बल्लारपूर वनपरीक्षेत्रातील कारवा नियतक्षेत्रातील घटना, वाघाच्या हल्ल्यात 1 व्यक्तीचा मृत्यू (1 person killed in tiger attack in Ballarpur forest range Karwa reserve)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर वनपरीक्षेत्रातील कारवा नियतक्षेत्रातील घटना, वाघाच्या हल्ल्यात 1 व्यक्तीचा मृत्यू (1 person killed in tiger attack in Ballarpur forest range Karwa reserve)
बल्लारपूर :- दिनांक 07 जानेवारी 2024 ला मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा 1 मधील राखीव वनखंड क्रमांक 492 मध्ये बल्हारपुर येथील श्री.शामराव रामचंद्र तिडसुरवार सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन जागीच ठार मारल्या बाबत दुपारी 1.30 वाजाचे सुमारास माहिती प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताच बनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त वनकर्मचारी समवेत तात्काळ घटना स्थळी पोहचले. मौक्यावर पाहणी केली असता वाघाचे हल्यात श्री. शामराव रामचंद्र तिडसुरवार यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरता आर्थिक मदत 25000.00 देण्यात आली. सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांनी दिली
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)