स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूर येथे तलवारी सह एका व्यक्तीस अटक (Local crime branch action, one person arrested with sword in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूर येथे तलवारी सह एका व्यक्तीस अटक (Local crime branch action, one person arrested with sword in Ballarpur)


बल्लारपूर :- भयमुक्त वातावरणात नवरात्र उत्सव हर्षोउल्लासात्त साजरा व्हावा म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्देश दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे पथक बल्लारपुर परीसरात पेट्रोलिंग करीत असता, पथकास गोपनिय माहीती मिळाली, आंबेडकर वार्ड बल्लारपुर येथील राहणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार रोहीत उर्फ चिन्ना नरसिंग बोगावार (२७) हा त्याचे राहते घरी लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने लोखंडी धारदार तलवार बाळगुन आहे. अश्या माहीती वरुन स्थागुशा, चंद्रपुर पथकाने नमुद ईसमाचे राहत्या घराची झडती घेतली असता त्याचे घरात एक लोखंडी धारदार पात्याची तलवार मिळुन आली. यावरून आरोपी रोहीत उर्फ चित्रा नरसिंग बोगावार (२७) रा. आंबेडकर वार्ड, बल्लारपूर विरुध्द बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कलन ४,२५ भाहका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कक्रिडवार, पोहवा धनराज करकाडे, अजय बागेसर, परोजें. प्रशांत नागोसे, प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे चापोहवा दिनेश अराजे स्थागुशा चंद्रपुर यांनी यशस्वीरीत्या कारवाई केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)