धक्कादायक ! चंद्रपूरात 7 वर्षीय मुलाला बिबट्यानं उचलून नेलं, वनविभागाला जंगलात मृतदेह आढळला (Shocking ! A 7-year-old boy was picked up by a leopard in Chandrapur, the forest department found the body in the forest)
चंद्रपूर :- चंद्रपूरमध्ये घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या चिमुरड्याला बिबट्याने उचलून नेले. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून शनिवारी सकाळी मुलाचे मुंडके वनविभागाला जंगलामध्ये सापडले. भावेश झारकर (वय - 7) असे मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 7 वर्षाचा भावेश घराजवळ खेळत असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला उचलून जंगलाकडे धाव घेतली. बराच वेळ झाल्यानंतरही भावेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. संशय आल्याने याची माहिती वन विभागाला आणि दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. तो चंद्रपूर जवळच्या सिनाळा येथील रहिवासी होती. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या पथकाने आणि पोलिसांनी भावेशचा शोध सुरू केला. चंद्रपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्गापूर परिसरात वेस्टर्न कॉल फील्ड च्या कोळसा खाणी आहेत. याच परिसराला लागून ऊर्जानगर आहे. या ठिकाणी महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल तसेच दुर्गापूरच्या परिसराला लागून घनदाट जंगल आहे. वाघ, बिबट यांचे वास्तव्य या परिसरात नेहमीच आढळून येते. काल सायंकाळी दुर्गापूर येथील एक चिमुकला घराशेजारी शौचास गेला. त्याला बिबट्याने उचलून नेल्याने एका वाहन चालकाने आरडाओरड केल्याने घटना लक्षात आली. शनिवारी सकाळच्या सुमारास जंगलामध्ये छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये भावेशचे मुंडके आणि इतर अवयव सापडले. ही माहिती कळताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. सध्या भावेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या