आता बाबुपेठ उड्डाणंपूल " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाबुपेठ उडाणपूल " म्हणून नामकरण (Now Babupeth flyover renamed as "Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Babupeth Flyover")

Vidyanshnewslive
By -
0
आता बाबुपेठ उड्डाणंपूल " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाबुपेठ उडाणपूल " म्हणून नामकरण (Now Babupeth flyover renamed as "Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Babupeth Flyover")


चंद्रपूर :- गेल्या अनेक वर्षांपासून बाबुपेठ परिसरातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र उड्डाणंपुलाच्या निर्माणत अनेक अडचणी उत्पन्न होत होत्या. राजकीय नेत्यांच्या पुढाकारातून बाबुपेठ उडानपुल आता पूर्णत्वास आला असून या परिसरातील नागरिकांची लोकभावना लक्षात घेऊन नुकताच काही दिवसापूर्वी नवरात्र उत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर बाबुपेठ उडानपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे या पुलाच्या निर्मितीत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या सह अनेक राजकीय नेत्यांचा पुढाकार महत्वाचा ठरला आहे. विशेष बाब म्हणजे या बाबुपेठ उड्डानपुलाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्नेहल रामटेके व अन्य नगरसेवकांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली होती व याला अनुसरून आज 15 ऑक्टोबर ला धम्मचक्र अनुवर्तन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला असून आता बाबुपेठ उड्डाणंपुल " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाबुपेठ उडानपूल " म्हणून ओळखले जाईल यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)