महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर, आदर्श आचारसंहिता लागू, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी (Maharashtra Assembly Election Announced, Model Code of Conduct Active, Voting on November 20 and Counting on November 23)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर, आदर्श आचारसंहिता लागू, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी (Maharashtra Assembly Election Announced, Model Code of Conduct Active, Voting on November 20 and Counting on November 23)


मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यासोबतच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ नामांकन करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२४ नामांकन छाननीची तारीख ३० ऑक्टोबर २०२४, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर २०२४ मतदानाची तारीख बुधवार २० नोव्हेंबर २०२४, मतमोजणीची तारीख : शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार, ४.९७ कोटी पुरुष मतदार, ४.६६ कोटी महिला मतदार, १.८५ कोटी युवा मतदार, २०.९३ लाख नवमतदार २८८ मतदारसंघ, २५ एसटी, २९ एससी, १ लाख १८६ पोलिंग स्टेशन, ५७ हजार, मतदान प्रक्रियेचे पूर्ण चित्रिकरण होणार, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरुन मतदानाची सोय, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना माहिती वृत्तपत्रात द्यावी लागणार, पैसे, ड्रग्ज, मोफत वस्तू किंवा दारु यांचे वाटप होणार नाही याची काळजी, विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभे सोबत नांदेड लोकसभेची पोट निवडणूक सुध्दा होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)