स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अवैध सुगंधित तंबाखूची साठवणूक व विक्री करतांना 1 व्यक्तीला अटक (Action of local crime branch, 1 person arrested for storing and selling illegal flavored tobacco)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अवैध सुगंधित तंबाखूची साठवणूक व विक्री करतांना 1 व्यक्तीला अटक (Action of local crime branch, 1 person arrested for storing and selling illegal flavored tobacco)

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखू विक्रीवर कारवाई करणेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना आदेशीत केले असता कोंडावार यांनी पथक तयार करून सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर 14 आक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींगवर असताना गोपनीय सूत्रांच्या द्वारे माहिती मिळाली की, बल्लारपूर येथील आंबेडकर वार्ड येथे एक व्यक्ती कीरायाची खोली घेऊन त्याठिकाणी अवैधरीत्या प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूचा साठा करून विक्री करीत आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 53 हजार 819 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने त्याठिकाणी धाड मारली, सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करीत आरोपी विरुद्ध पो.स्टे. बल्लारपूर येथे अपराध क्रमांक 962 /2024 कलम 223, 275, 123 भा.न्या.सं. 2023 सहकलम 30 (2) 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे चे सपोनि. दीपक काँक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले, पोह. किशोर वैरागडे, रजनीकांत पुट्टावर, सतिश अवतरे यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)