नागपूर :- नागपूर सिकंदराबाद वंदे भारत लवकरच सुरू होणार आहे. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वन व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र शासन यांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांना ७ डिसेंबर २०२२ रोजी पत्र लिहून विनंती केली होती की, त्यांच्या सततच्या पत्रव्यवहारामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे आता वंदे भारत ट्रेन लवकरच प्रवाशांसाठी सुरू केली जाईल. पूर्व विदर्भातील रेल्वे प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार आहे, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 16 सप्टेंबर पासून ही ट्रेन सिकंदराबाद येथून सोमवारी दुपारी 1 वाजता सुरू होऊन आणि नागपूर येथून ते रात्री 8:20 वाजता पोहोचेल, ते शक्यतो पहाटे 5 वाजता सुरू होईल आणि 12:15 वाजता तांत्रिक कारणांमुळे, वेळ आणि दिवस बदलण्याची शक्यता आहे नागपूरनंतर ती सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम, काझीपेठ, सिकंदराबाद स्थानकावर थांबेल, 16 डब्यांची ही ट्रेन सरासरी 80 किमी वेगाने 7:20 मिनिटांत 578 किमी अंतर कापले जाईल, तथापि, या ट्रेनचा कमाल वेग ताशी 130 किमी आहे. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे पर्यटक, रुग्ण, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक यांना फायदा होणार आहे. एकीकडे वंदे भारत ट्रेन च्या स्वरूपात नवीन रेल्वे मिळत असल्यामुळे प्रवाशांत आनंदाचे वातावरण असले तरी बल्लारशाह मार्ग मुंबई व पुण्यासाठी नियमित रेल्वे केव्हा सुरु होईल असा प्रश्न प्रवासी विचारत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या