तांत्रिक चुकीमुळे नागपुरातील एका एटीएम मधून अतिरिक्त पैसे, नागरिकांची पैसे काढण्यासाठी झुंबळ, जवळपास 3 लाख रु चे बँकेला नुकसान (Excess money from an ATM in Nagpur due to technical error, citizens rush to withdraw money, bank loses nearly Rs 3 lakh)
नागपूर :- नागपूरमधील एका बँकेच्या एटीएमबाहेर अक्षरश: झुंबड उडाली होती. कारणही तसंच होतं. एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे तिथे झालेली एक तांत्रिक चूक, पण त्यामुळे पैसे काढणाऱ्यांची मात्र चैन होती. असं नक्की घडलं तरी काय ? या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच 6 सप्टेंबरला एका बँकेच्या एटीएममधून प्रत्येक विड्रॉलमागे 600 रुपये अतिरिक्त मिळत असल्याने लोकांनी पैसे काढण्यासाठी झुंबड केली. ही बातमी कळताच शहरातील नागरिकांनी तेथे धाव घेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली. एटीएममधून 500 रुपये काढले तर 1100 रुपये मिळत होते, तर 1000 रुपये काढल्यावर हातात चक्क 1600 रुपये येत होते. म्हणजेच एटीएममधून 600 रुपये जास्त येत होते. या घटने माहिती मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांनी या एटीएमकडे तडक धाव घेतली, एटीएमबाहेर अक्षरश: झुंबड उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील खापरखेडा भागात त्या बँकेचे एटीएम आहे. तेथे काही तांत्रिक चुकींमुळे एटीएममधून जास्त पैसे येत होते. 6 सप्टेंबरच्या दुपारी ही घटना उघडकीस आली. तेथे पैसे काढायला गेल्यावर ज्या लोकांनी 500 रुपये काढले त्यांना 1100 रुपये मिळत होते. तर ज्यांनी 1000 रुपये काढले त्यांना थेट 1600 रुपये मिळत होते. म्हणजेच पैसे काढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तब्बल 600 रुपये जास्त मिळत होते. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर शहरातील इतर नागरिकांनीही ताबडतोब तेथे धाव घेत पैसे काढण्याचा प्रयत्न केला. एटीएम मध्ये पैशांच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं बोलल जात आहे. खापरखेडा येथील स्थानिक नागरिक अरुण महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्थानिक पोलीस आणि संबंधित बँकेला कळवले. तेव्हा दुपारी एटीएम बंद करून दुरूस्ती करण्यात आली. मात्र तोपर्यंत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे निघून गेल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. खापरखेडा येथील बाजार चौकातील हे एका बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये पैसे टाकताना तांत्रिक चूक झाली, असल्याचं माहिती समोर आली आहे. मात्र ही चूक खातेधारकांना मालामाल बनवून गेली. खापरखेडा शहराच्या मध्यभागी असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएमध्ये गावात पैसे काढण्यासाठी धांदल उडाली. विशेष म्हणजे हा प्रकार पहिल्यांदा नाही, तर यापूर्वी सुद्धा एकदा घडला आहे. एटीएममध्ये बुधवारी संध्याकाळपासून तांत्रिक बिघाड आला. जो तो आपल्या जवळच्या लोकांना ही बातमी देत विड्रॉल करायला लावत होता. 19 जून 2018 रोजी नाशिकमधील एका बँकेच्या ATM मध्ये 5 पट पैसे निघण्याचा प्रकार 22 जून 2022 ला याच ATM मधून दुप्पट पैसे निघत असल्याची घटना घडल्या आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या